ताजी बातमी

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या देण्याचा गृहनिर्माणचा उपक्रम

मुंबई  - कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज पार पडला. 

महाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. 

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात