अकार्यक्षम योगी सरकार ला साडी-चोळी,बांगड्या पाठवणार युवक पँथर ची मोहीम
हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १९ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यात करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झालेला होता, इतकी क्रुर आणि अमानवी घटना तिच्यासोबत झाली असतांना योगी सरकारच्या पोलीस प्रशासनाने मनीषा वाल्मिकी च्या मृतदेहावर सुध्दा पाशवी अन्यायच केला आहे, मनिषा चा मृतदेह तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन न करता किंवा त्यांना अंतिम संस्कारासाठी न बोलावता त्यांच्या माघारीच मनिषा चा देह परस्पर पेट्रोल टाकून जाळून टाकला. या अमानवीय घटनेचा निषेध नोंदविणे आवश्यक झालेले आहे कारण अशा प्रकारच्या घटना देशभर विशेषता उत्तर प्रदेश मध्ये वारंवार घडत आहेत. या घटनेचा, उत्तरप्रदेश सरकारचा, उत्तर प्रदेश पोलीसांचा निषेध करण्याकरीता योगी सरकार, हाथरस एस. पी व हाथरस डी. एम व खोटी बातमी दाखवुन आरोपी वाल्मिकी समाजाचे होते हे दाखविणारा आज तक चॅनेल ला *युवक पँथर* संघटने तर्फे पुर्ण महाराष्ट्र भरातुन साडी-चोळी आणि बांगड्या पाठवण्याची मोहीम झेडली आहे, जेणे करुन त्यांना लाज वाटेल आणि ते लवकरात लवकर पीडित युवतीला न्याय देतील आणि परत या गोष्टी होणार नाहीत, याकरीता उपाययोजना करतील।
आणि यानंतर जिथे कुठे अशी बलात्काराची घटना घटेल तेथील सरकार आणि कार्यवाही न करणाऱ्या पोलीस स्टेशन व एस. पी ना *युवक पँथर* चा याच प्रकारचा आहेर करेल।