ताजी बातमी

सोलापूर विभागातील, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले बक्कल नंबर 225 यांनी सावळेश्वर टोळ नाक्यावर ट्रॅफिक चे कर्तव्य बजावत असताना त्यांना समोरून  एक गॅस टँकर वेडा वाकडा येत असताना दिसला.  ते पाहून पोलीस नाईक चौगुले यांनी त्याच्या ड्रायव्हर ला थांबण्याचा इशारा केला, परंतु त्यातील ड्रायव्हर हा सीटवर पडलेला दिसल्याने  पोलीस नाईक चौगुले यांनी मोठ्या सिताफिने चालू गॅस टँकरवर चढून ड्रायव्हर साईड चा दरवाजा उघडून ब्रेक मारून गॅस टँकर थांबविला. पोलीस नाईक चौगुले यांनी केलेल्या धाडसी कार्यामुळे मोठी अपघाती दुर्घटना टळली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात