मिरा भाईंदर महानगरपालिके मार्फत दरवर्षी प्रमाणे 23 ठिकाणी गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती
सदया कोविड 19 महामारी रोगाचे
संकट असल्याने कोविड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने
पुढाकार घेउुन 52 ठिकाणी गणेश मुर्तीचे स्वीकृती केंद्रे निर्माण केलेली
होती. तसेच स्वीकृती केंद्रापासून विसर्जन स्थळी नेण्यासाठी जवळपास 215
टेम्पो (मजुरासह) नियुक्त करण्यात आले होते. तसेच मिरा भाईंदर
महानगपालिकेने 23 ठिकाणे गणपती विसर्जनासाठी गणपती विसर्जन ठिकाणी टेबल,
खुर्च्या, मंडप इत्यादी सामुग्रीसह गणपती विसर्जनाची तयारी करण्यात आली
होती.
यावर्षी व मागील वर्षी घरगुती, सार्वजनिक, गौरी गणपती विर्सजनचा तक्ता
खालीलप्रमाणे
गोषवारा
सन - 2019 (मागील वर्षी)
सन - 2020 (चालू वर्षी)
एकूण घरगुती गणपती
एकूण सार्वजनिक गणपती
एकूण गौरी गणपती
एकूण
एकूण घरगुती गणपती
एकूण सार्वजनिक गणपती
एकूण गौरी गणपती
एकूण
19309
1013
247
20569
8710
302
165
9177
वरीलप्रमाणे यावर्षी साधारण एकूण घरगुती गणपती 8,710, एकूण सार्वजनिक
गणपती 302, एकूण गौरी गणपती 165, एकूण 9177 गणपती बाप्पाचे विसर्जन
करण्यात आले आहे.
मिरा भाईदर महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. ज्योत्स्ना हसनाळे
यांच्या वतीने नागरिकांना गणपतीचे शांततेत विसर्जन पार पाडण्याबाबत आवाहन
करण्यात आले होते. त्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील
नागरीकांनी, सार्वजनिक गणपती मंडळानी, गणेश भक्तांनी गणपती विसर्जन सोहळा
कोणताही अनुचीत प्रकार न घडता शांततेत पार पाडल्या बद्दल मा. महापौर
यांनी नागरिकांचे, सार्वजनिक गणपती मंडळाचे व गणेश भक्तांचे आभार व्यक्त
केले.