कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २१ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २१ हजार ६९७ गुन्हे दाखल झाले आहेत. ३२ हजार ५६६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १८ कोटी ९७ लाख ६७ हजार ९४४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ०३ ऑगस्ट या कालावधीत
अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ९४ हजार ७९८ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२४ (८८३ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०९ हजार २८४
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६
जप्त केलेली वाहने – ९४, ४४१
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – १०७