ताजी बातमी

वर्धा जिल्ह्यातील सर्व दुकाने, मार्केट, आस्थापना ह्या दररोज सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु  जिल्ह्यात दिवसेंदिवस कोव्हिड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ होत असुन, सार्वजनिक ठिकाणी विशेषतः दुकाने, मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी होत असते. या ठिकाणांहून कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने अशा सार्वजनिक ठिकाणांचे आठवड्यातून एकदा निर्जतुकीकरण करणे अत्यावश्यक असल्यामुळे जिल्हादंडाधिकारी विवेक भीमनवार, यांनी जिल्ह्यातील सर्व दुकाने 31 जुलै पासून प्रत्येक शुक्रवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील दवाखाने, औषधांची दुकाने व दुध वितरण केंद्रे वगळता इतर सर्व मार्केट, दुकाने निर्जतुकीकरणाकरीता बंद ठेवण्यात यावीत. नगर परिषदा, ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी दर शुक्रवारी या सार्वजनिक ठिकाणांचे निर्जतुकीकरण करावे. तथापि याकाळात सर्व शासकीय व खाजगी आस्थापना, बँका  नेहमीप्रमाणे सुरु राहतील. आदेशाची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्याची जबाबदारी संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा इनसिडंट कमांडंट यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात