कंटेंटमेंटझोन मध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल - मंत्री अस्लम शेख
मुंबई, : बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली
श्री.शेख म्हणाले की, कंटेंटमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल. बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्यावतीने ऑनलाईन प्रणाली स्थापित केली जाईल. कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल. देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही. मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावले जाईल, असेही श्री.शेख यांनी सांगितले
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.