ताजी बातमी

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे साप्ते व कोणे येथे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन आणि ‘कृषी संजिवनी सप्ताह’ शुभारंभ केला. 


शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या मदतीने उभारलेल्या शेडनेडची पाहणी केली तसेच मनरेगा अंतर्गत उभारलेल्या शेततळे व फळबाग याची देखील पाहणी केली.त्यांनतर शेतात यांत्रिकी पध्दतीने भात रोपांची लागवड केली.तसेच शेतीच्या बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला.


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, ‘आत्मा’ उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तहसीलदार दीपक गिरासे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी आदी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात