निळवंडे धरणाच्या सुरू मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठक घेतली.
निळवंडे धरणाच्या सुरू मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठक घेतली. नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, कोपरगाव, अकोले तालुक्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेक विषय या बैठकीत मांडले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. आशितोष काळे, डॉ. किरण लाहमटे या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी प्रमुख कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या कालव्याच्या कामासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही. मराठवाड्याला लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी महाविकासआघाडी सरकार वचनबद्ध आहे. मुंबई महानगरपालिकेला पाण्याच्या पूनर्वापराबाबत सुचना करणार आहे. या पुनर्वापर केलेल्या पाण्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणी प्रश्न काही प्रमाणात सोडवता येईल.