पोलीस अधिकारी यांनी निभावला माणुसकी धर्म
हिंदुजा रुग्णालय , मुंबई येथे १४ वर्षांच्या सनाफातिम खान ही ला आज अचानक ओपन हार्ट सर्जरी वेळी A+ रक्त लागणार होते. आज मुंबई मध्ये भयंकर चक्री वादळ व कोरोना मुळे रक्त देण्याकरिता तिच्या कुटुंबातील व नातेवाईक कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाही. अश्या गंभीर परिस्तिथीत ऑन ड्युटी असलेले पोलीस क्रमांक १४००५५ / आकाश बाबासो गायकवाड , नेमणूक - स.पो. ताडदेव हे काहीही विचार न करता फक्त माणुसकी हाच आपला धर्म म्हणून तिच्यासाठी अश्या संकट वेळी धाऊन आले आणि रक्तदान करून या मुलीला जीवनदान दिले. खरच यातून पुन्हा सिद्ध झाले संकट कोणत्याही असो पोलीस हे देव बनून साक्षात मदतीला येतात.
#महाराष्ट्र_पोलीस
#सलाम_मुंबई_पोलीस
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.