सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्या आता 992 पर्यंत पोहोचली आहे.
आज 160 अहवाल प्राप्त झाले. यात 117 निगेटिव्ह तर 43 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 25 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे .
आज एक महिला मृत्यू पावल्याची नोंद आहे .आतापर्यंत सोलापुरात 8305 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी 7471 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 834 अहवाल प्रलंबित आहेत. यात6479 निगेटिव्ह तर 992 पॉझिटिव्ह आले आहेत.
आज बरं झाल्याने 49 जणांना घरी सोडण्यात आलं.
आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 992 असून एकूण मृतांची संख्या 89 आहे. सध्या 460 जणांवर उपचार सुरू असून 443 जणांना बरं झाल्याने घरी सोडण्यात आलं आहे. आज जी महिला मृत पावली ती 65 वर्षीय , निराळे वस्ती भागातील आहे.
आज जे नवीन रुग्ण मिळून आले त्यांची माहिती पुढील प्रमाणे .
कुमठा नाका 1 पुरुष
शिवाजी नगर बाळे 1 पुरुष
निराळे वस्ती 1 महिला एमआयडीसी रोड 1 महिला.
दमानी नगर 1 महिला
होडगी रोड मजरेवाडी 2 पुरुष मिलिंद नगर बुधवार पेठ 1 पुरुष. दत्त चौक 1 पुरुष.
बॉम्बे पार्क 1 पुरुष.
वसंतनगर पोलिस लाईन 1 पुरुष 1 महिला.
लक्ष्मी पेठ 1 पुरुष.
उत्तर कसबा माळे गल्ली 1 पुरुष 2 महिला.
दक्षिण कसबा 1 पुरुष.
मौलाली चौक 1 पुरुष.
दाजी पेठ 1 पुरुष.
भवानीपेठ 1 पुरुष 2 महिला. सलगर वस्ती 2 पुरुष.
समाधान नगर 1 महिला .
अक्कलकोट रोड 1 महिला.
मराठा वस्ती 1 महिला.
बुधवारपेठ 1 पुरुष 5 महिला .
गुरूनानक चौक 3 पुरुष.
कर्णिक नगर 1 पुरुष.
रविवार पेठ 2.
पुरुष विडी घरकुल 1 महिला.
फॉरेस्ट न्यू तिर्हेगाव 1 पुरुष .
हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर 1 महिला .
मौजे बारडी तालुका पंढरपूर 1 पुरुष
@ सोलापूर शहर पोलिसांनी संचारबंदी काळात नियम तोडून वाहन चालवणाऱ्यांची दुचाकी, तीनचाकी चारचाकी वाहन जप्त केली होती. ती परत देण्याची कार्यवाही उद्या सकाळपासून सुरू होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी नियोजन केलं आहे .ज्यांचे क्रमांक प्रसिद्ध झाले आहेत त्या लोकांनीच दिलेल्या वेळेत वाहन परत घेऊन जाण्यासाठी यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. ही यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलीआहे. उद्या प्राधान्याने तीन आणि चार चाकी वाहन सोडण्यात येणार आहेत .
@पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला आहे.
@ मृत रुग्णाचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन नियम मोडणे, कामात हलगर्जीपणा या आरोपावरून जिल्हा प्रशासनाने सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.