ताजी बातमी

सातारा :  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 19 कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कराड चॅरिटेबलचे  हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर, तसेच डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

या बाधित रुग्णांमध्ये  कराड तालुक्यातील उंब्रज येथील 40 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवती, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय युवक व 44 व 18 वर्षीय महिला.  

पाटण तालुक्यातील गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक शिराळ येथील 26 व 25 वर्षीय महिला, भरेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, बनुपरी येथील 31 वर्षीय महिला 40,48,10, 19 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय युवक, शितापवाडी येथील 40, 19 व 14 वर्षीय पुरुष असे 19 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात