मुंबई उपनगरातील कोविड१९ सेंटर असेल कूपर रुग्णालय , सेवन हिल्स रुग्णालय आणि बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर ला भेट दिली: परिवहन मंत्री अनिल परब
आज मुंबई उपनगरातील कोविड१९ सेंटर असेल कूपर रुग्णालय , सेवन हिल्स रुग्णालय आणि बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर ला भेट दिली आणि परिस्थीचा आढावा घेतला. या वेळी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्यास सूचना केल्या आहेत.
कूपर हॉस्पिटल तसेच सेवेन हिल्स हॉस्पिटलमध्ये सध्याच्या क्षमतेपेक्षा अजून प्रत्येकी दोनशे बेड्स वाढविण्याचे प्रस्तावित आहे, या संबंधी देखील चर्चा करण्यात आली .
या प्रसंगी बृहनमुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कुपर हॉस्पिटलचे डीन पिनाकिन गुजर, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरच्या डीन विद्या माने, सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डॉ. अडसूळे, शिक्षण सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, नगरसेविका राजूल पटेल, नगरसेवक बाळा नर आणि माजी नगरसेवक प्रमोद सावंत उपस्थित होते.