ताजी बातमी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या शिष्यवृत्ती संदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता मिळवली असून, लाभार्थी असलेल्या जवळपास 1 लाख 97 हजार 16 विद्यार्थ्यांना 6 दिवसाच्या आत त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती आपापल्या खात्यावर मिळणार आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीसाठी मुंबईत गेलेल्या मंत्री मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या शिष्यवृत्ती संदर्भात मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास तात्काळ मान्यता देत, वित्त विभागामार्फत शिष्यवृत्तीचा 462.69 कोटी रुपये निधी समाज कल्याण आयुक्तालयास वर्ग केला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात