कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील मनुष्यबळ, साधनसामग्री, अलगीकरणाबाबत नियमावली आदींबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेतली.
जिल्ह्यातील सद्य:स्थिती, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील मनुष्यबळ, साधनसामग्री, अलगीकरणाबाबत नियमावली आदींबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शासक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी उपस्थिती होते.