ताजी बातमी

मुंबई दिनांक 16:  स्पर्श गौरव सागरवेकर, वय वर्षे १२, गिरगावचा राहणारा,  खेळणीसाठी साठवलेले ३२५७ रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आणि बाल योद्धा म्हणून कोरोना विषाणुविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला. बालमनाला झालेला हा "मानवतेचा स्पर्श" मनाला खुप प्रोत्साहन देणारा, या युद्धाशी नेटाने लढण्यासाठी बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या पैशातून स्पर्शने गरजूंना १०० किलो साखरेचे वाटप केल्याचेही त्याने कळवले आहे.  अशी संस्कारक्षम मुले आणि त्यांना घडवणारे पालक यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. या सह्दय मदतीबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे, या बालभावनेला मला मनापासून सलाम करावा वाटतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.


आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३३८.११ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात