ताजी बातमी

राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंत पाटील यांची भेट घेऊन गोदावरी पत्रात,बॅरेजेस व डाव्या कालव्यातून सर्व चाऱ्यामध्ये पाणी सोडणे संदर्भात बैठक पार पडली.घनसावंगी मतदार संघातील शहागड,पाथरवला बु,जोगलदेवी,मंगरूळ,राजाटाळी या बॅरेजेसमध्ये पाणी सोडणे बाबत शेतकऱ्यांनी मागणी केली होती.

उन्हाळा सुरू असल्याने,नागरिकांचा व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही.शेतीमधील पिकासाठी आवर्तन सोडणे गरजेचे होते.या मागणीची दखल घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून गोदावरी पात्रात,बॅरेजेसमध्ये व डाव्या कालव्यातून सर्व चाऱ्यांना पाणी सोडण्यासह राजाटाकळी बॅरेजेसमधून सिरसवाडीला पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री, ना.जयंत पाटील यांनी गोदावरी पाटबंधारे (कडा) औरंगाबाद,कार्यकारी संचालक श्री. शिंदे यांना दिल्या.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात