कोरोना टेस्टिंग लॅबचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला फायदा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली लॅबची पाहणी
जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आलेली स्वॅब तपासणी लॅबचे काम आजपासून सुरु झाले आहे. कोरोनाची प्राथमिक तपासणी या लॅबच्या माध्यमातून होणार असून त्यामुळे रुग्णांचे निदान तात्काळ होऊन पुढील निर्णय घेणे सहज शक्य होणार आहे. या लॅबच्या माध्यमातून दिवसाला 180 नमुने तपासणी होणार असून दुसरे यंत्रही लवकरच कार्यरत झाल्यावर त्याची क्षमता 360 पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी होणार असल्याने या लॅबचा फायदा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला होणार असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.