ताजी बातमी

मुंबई दिनांक २८:  बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्यावतीने श्री. विजय कांबळे जनरल मॅनेजर, मुंबई यांनी काल  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच मुख्यमंत्री कार्यालयात जमा केला.

 

कोविड १९ या विषाणुविरुद्ध च्या लढ्यात अबालवृद्ध सहभागी होत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनीही यात सहभागी होत आपले योगदान दिले असून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे.

 

या मदतीसह आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण २८५ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रला आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.


मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी  खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात