ताजी बातमी

*मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २८० कोटी रुपये जमा*


मुंबई दिनांक २५: आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी झाले आहेत. या युद्धात त्यांनी आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांची  तसेच गरजु लोकांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामात देखील पुढाकार घेतला आहे.  

या दातृत्वभावातूनच आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८० कोटी रुपये जमा झाले आहेत.


समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करणाऱ्या दात्यांचे मदतीचे हात अनमोल आहेत. या संकटकाळात बालकांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.  ही मदत फक्त पैशात सांगता किंवा मोजता येत नाही. कुणी अडकलेल्या नागरिकांना जेवण देत आहे. कुणी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करत आहे, कुणी वस्तु रुपाने तर कुणी अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करत आहे.  समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून केलेल्या या मदतीला कृतज्ञतेचे कोंदण आहे म्हणून त्यांचे हे दातृत्व विलक्षण शोभून दिसत आहे.


या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि लाखमोलाच्या साथीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने सर्व जनतेचे आभार मानले आहेत. त्यांच्या मदतीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.  यापुढे ही अशाच सहकार्याची आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करतांना आपण सर्वजण मिळून कोरोनाविरुद्धचे हे युद्ध नक्की जिंकू असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला आहे.  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी  खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात