राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ :अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो अन्न धान्य रेशन दुकानांमधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमध्ये या अन्न धान्याचे वाटप १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. धान्य वाटप करताना प्रत्येक दुकानाच्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम व सामाजिक अंतर राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.