ताजी बातमी

उद्योग आस्थापना सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे, या पार्श्वभूमीवर नागपूर शहर आणि विभागातील कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल व गर्दी होऊ नये यासाठी दक्षता घेण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. 

भाजीपाला व किराणा माल घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्याच्या सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या रमजानमध्ये मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नमाज अदा करावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दक्षता घेण्याबाबत सांगण्यात आले. लॉकडाऊन संपेपर्यंत स्थलांतरित कामगारांची काळजी घेऊन त्यांची सर्व व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी प्रशासनाला दिल्या.


यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना, सहआयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच सर्व परिमंडळाचे पोलीस आयुक्त उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात