ताजी बातमी

महाड शहर पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असणाऱ्या महिला पोलीस शिपाई  213 सोनल बर्डे या रायगड जिल्हा पोलीस दलाअंतर्गत दामिनी पथकाच्या ड्युटीसाठी आहेत. संपूर्ण जगातील व्यवस्था कोरोना आजारासोबत लढत आहे. या पार्श्वभूमीवर  महिला पोलीस शिपाई  213 सोनल बर्डे या आपल्या कर्तव्यासोबत महाड शहरालगत रोडवरील एका वृद्ध निराधार व्यक्तीची काळजी घेत आहे. पोलीस शिपाई  213 सोनल बर्डे या गेल्या काही महिन्यांपासून रोज ड्युटीवर जाण्यापूर्वी त्यास खायला जरूर देतात. नजीकच्या इतर व्यक्तींच्या साहाय्याने त्या व्यक्तीची आंघोळ, केस कापणे, दाढी करणे याची देखील व्यवस्था त्या स्वखर्चाने करीत आहेत. 


*अशा माणुसकीला सलाम*

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात