ताजी बातमी

कोरोनाच्या कठीण काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. याच आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आज शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे मुख्याध्यापक संघ व कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करूनच रक्त संकलन केल्याबद्दल आयोजक व रक्तदात्यांचे विशेष कौतुक केले.


जवळपास १०० शिक्षकांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य जपले. या शिबिरास उपस्थित राहून या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. हे संकलित रक्त जिल्हा शासकीय रुग्णलयामध्ये रुग्णांच्या गरजेसाठी पुरवले गेले. तसेच यावेळी सर्व रक्तदात्यांना व उपस्थित असणार्‍या सर्वांना कुरूंदवाड रोटरी क्लबच्यावतीने मोफत सॅनेटाझर व मास्कचे वाटप केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात