ताजी बातमी

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्वॅब तपासणी करण्यात येईल. उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थीर आहे. जिल्ह्यातील रूग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह सर्व यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली आहे व काटेकोर अंमलबजावणी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत जनतेने घरीच राहून सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करून विनाकारण रस्त्यांवर येणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात