ताजी बातमी

लॉकडाऊन केल्यामुळे 25 चाकरमान्यांनी मुंबईतून कोकणात येण्यासाठी रेल्वेरुळांवरून चालत येण्याचा घाट घातला. खेड तालुक्यातील खवटी स्टेशनजवळ मात्र पोलिसांनी त्यांना पकडले असून पुढे जाण्यास बंदी केली आहे.

कोरोनाची पुणे, मुंबई येथील वाढती साथ पहाता संचारबंदी झुगारून देत अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. संचारबंदी असल्यामुळे गावी परतण्यासाठी हे लोक वाट्टेल त्या कल्पना लढवत आहेत. मुंबईतून कोकणात आपल्या मूळ गावी येण्यासाठी २५ चाकरमान्यानी कोकण रेल्वेच्या रूळावरून चालत येण्याची युक्ती अवलंबली. हे चाकरमानी पायी चालत खेडपर्यंत आले. खेड नजीकच्या खवटी खवटी रेल्वे स्टेशन जवळ हे चाकरमानी जेवण बनवत असता पोलिसांनी त्यांना हटकले आणि सगळा प्रकार उघड झाला. खेड प्रशासनाने त्यांना ताब्यात घेेेऊन त्यांना पुढे जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी केली. त्यांची व्यवस्था तालुक्याच्या बंदीस्त क्रिडासंकुलात केली आहे. रायगड पोलीस तसेच कोकण रेल्वे मार्गावरील एकाही स्टेशनवर या २५ जणांना कोणीच अडवले कसे नाही हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात