ताजी बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये देऊन प्रतिसाद दिल्याची माहिती महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली.

या संदर्भातील पत्र महापारेषणकडून आज मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे महापारेषणने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात