मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द
कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने 35 लाखांचा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’ साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी आज मंत्रालयात सुपूर्द केला.