ताजी बातमी

*पालिका अधिकाऱ्यांनी वेगाने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश* 



मुंबई दि ३१: मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून नगरसेवकांच्या सर्व २२७  प्रभागांमध्ये पालिकेची भरारी पथके आजपासून घराघरांमध्ये तपासणी सुरु करणार आहेत. राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मुंबईमधील लोकसंख्या,दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेस हे निर्देश दिले. काल सायंकाळी त्यांनी महापालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली व महत्वपूर्ण सुचना केल्या.

यावेळी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची तसेच पुढील नियोजनाच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात