ताजी बातमी

आज दि.14/03/2020 रोजी सकाळी 10:15  वाजेच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजिंठा  प्रवासी बोट 88 प्रवाशी घेऊन मांडवा जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर असताना अचानक बुडू लागल्याने बोटीवरील प्रवास करणारे पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड चालू केला असता सागरी गस्तीवर निघालेल्या  रायगड जिल्हा पोलीस दलातील  सद्गुरू कृपा बोटी वरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी पो. ना बक्कल न. 891 श्री प्रशांत घरत यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांचे मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अत्यन्त  सावधगिरीने त्यावरील 88 पुरुष, महिला व बालके यांचा जीव वाचवून त्यांना पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले.

  सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसुन सुटका झालेल्या सर्व प्रवाशी यांनी व पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस कर्मचारी घरत यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता व धाडसाचे कौतुक केले  आहे. रायगड जिल्हा पोलिस दलातील सागरी सुरक्षा दल नेहमीच कार्यतत्पर असल्याची प्रचिती आज या घटनेवरून पुन्हा एकदा दिसुन आली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात