ताजी बातमी

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला शासकीय ठराव

औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शासकीय ठराव मांडला होता. या विमानतळाचे पुनर्नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याकरिता याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमानचालन मंत्रालयाकडे पाठविण्यासाठी राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर तो पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या ठरावाला सभागृहाने एकमताने संमती दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात