ताजी बातमी

सावत्र पित्याने दोन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भायखळा येथे उघडकीस आली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी अन्सार माहिमी (३५) या नराधमाला मालाड येथून शोधून काढून अटक केली आहे.

भायखळा पश्चिमेला अन्सार हा पत्नी, मुलगा आणि त्याच्या दोन सावत्र मुलींसह वास्तव्यास आहे. पत्नी घरी नसताना अन्सार आपल्या १३ आणि १५ वर्षांच्या सावत्र मुलींवर मागील चार ते पाच महिन्यांपासून अत्याचार करीत होता. गणपतीच्या उत्सवादरम्यान या दोन मुली मुंब्रा येथे राहणाऱ्या आजीकडे गेल्या असता त्यांनी हा सर्व प्रकार तिला सांगितला. सुरुवातीला तक्रार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या या दोन्ही मुलींनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांत धाव घेतली. दोघींच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिस ठाण्यात ११ ऑक्टोबर रोजी बलात्कार, पोक्सो तसेच इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कुणकुण लागताच अन्सार याने भायखळा येथून पळ काढला. पोलिस निरीक्षक कोळथकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित टेकवडे यांच्यासह हौसनूर, मंडलिक, कुंभार यांच्या पथकाने मालाडच्या कुरार व्हिलेज येथून अन्सार याला शोधून काढले. घरी कुणी नसताना अन्सार जबदरस्ती करीत होता. याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देत असल्याने कुणाला सांगता आले नसल्याचे या दोघींनी सांगितले. अन्सार याचा वांद्रे येथे बांधकाम कंत्राटदाराचा व्यवसाय असून याप्रकरणात त्याच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. आईला सांगूनही तिने दुर्लक्ष केल्याचे या दोघींनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

















सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात