'उत्तम' लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल सेवेत आता एका नव्या सुविधेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. असंख्य प्रवाशांची गर्दी असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या सेवेत आता एक नवी लोकल प्रवाशांच्या सेवेत हजर झाली आहे.
त्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले उत्तम असे रेक लोकलचे डबे प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत. मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या ६९व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत 'Uttam rake' ही लोकल रुळांवर धावली.
रोजच्या लोकल गाड्यांच्या तुलनेत या रेल्वेमध्ये काही अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन बटण, बदललेली आणि आरामदायी बैठकव्यवस्था, उभं राहिल्यानंतर पकडण्यासाठीचे हँडल या सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. ्
चर्चगेट आणि विरार या मार्गावर ही लेडिज स्पेशल लोकल धावणार आहे. मंगळवारी सायंकाळी ६.१३ मिनिटांनी या लोकलने चर्चगेटवरुन निघत तिचा पहिला प्रवास केला. पश्चिम रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली.