ताजी बातमी

मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. मंदिरातील चोरीची ही आठवडय़ातील दुसरी घटना आहे. यापूर्वी नवगण राजुरी येथील गणेश मंदिरातील एक दानपेटी पळवली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा चोरटय़ांनी मंदिरांमधील दानपेटय़ांनाच लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

दहिफळ वडमाउली येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी रेणुकादेवीच्या मंदिरात प्रवेश केला. या वेळी त्यांनी तेथील दानपेटय़ा फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुजारी रामिलग महादेव ठोंबरे (वय ५५) यांना जाग आली. त्यांनी विरोध केला असता चोरटय़ांनी पुजारी ठोंबरे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर दानपेटय़ा फोडून त्यातील देणगीची रक्कम लुटली. सकाळी घटनेची माहिती कळताच केजचे पोलीस उपाधीक्षक अशोक आम्ले यांच्यासह ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंदिराच्या पुजाऱ्याचा खून करून त्या ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान मंदिरात चोरी होण्याची ही आठवडय़ातील दुसरी घटना असून नवगण राजुरी येथील गणेश मंदिरातही दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी चोरटय़ांनी एका दानपेटीतील रक्कम त्या ठिकाणी उभी असलेली मोटारसायकल लंपास केली होती. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र अद्यापही त्याचा तपास लागला नाही. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा वडमाऊली येथील मंदिरात चोरी करून पुजाऱ्याची हत्या झाल्याने पोलीस प्रशासन हादरून गेले आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात