ताजी बातमी

रेल्वे स्थानकांतील पादचारी पूल किंवा सरकते जिना उतरत असताना प्रवाशांना धक्का देणे आणि अन्य साथीदाराच्या मदतीने बेसावध प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणे, या पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. अझीम शेख उर्फ डब्बू उर्फ जादूगार असे या आरोपीचे नाव आहे. या टोळीबाबत अंधेरी आणि चर्चगेट स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. टोळीतील उर्वरित साथीदार मोहित उर्फ मुन्ना, वसीम अजगर या आरोपींचा शोध सुरू आहे. टोळीतील म्होरक्याला 'जादूगार' म्हणून ओळखले जात होते.



विलेपार्ले येथे राहणारे ५३ वर्षीय विरेंद्र जैन हे स्थानकातील पादचारी पूल उतरत असताना आरोपीने मागून धक्का दिली. यावेळी विरेंद्र बेसावध होताच आरोपीने विरेंद्र त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून घेत पळ काढला. कापडी पिशवीत सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी विरेंद्र यांनी अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

स्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीची ओळख पटवल्यानंतर संशयित आरोपी जोगेश्वरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीच्या नालासोपारा येथील घराची झडती घेतली असता घरातून लाख ९८ हजारांची रोख रक्कम सापडली. उर्वरित रक्कम साथीदारांनी नेल्याचे अझीमने तपासात सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात