धक्कादायक! नेत्याच्या मुलाची बेदम मारहाण करून हत्या; खूनाचं कारण ठरलं कुत्रा
सहारनपूर: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे कुत्रा हे एकमेव कारण होतं. राग आणि बाचाबाचं रुपांतर भांडणात बदललं आणि तरुणाची हत्या करण्यात आली. हत्या झालेला तरुण लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्याचा मुलगा होता. यामध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्याला आणि त्यांची पत्नी जखमी झाली आहे. भटनागर पोलिसांच्या म्हणण्यानुसार दामोदरपुरी इथे गुरुवारी संध्याकाळी कुत्र्याच्या विष्ठेवरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि वादातून ही निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये नेत्याच्या मुलाची तरुणांनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे.
लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेश सचिव हरिओम पासवान यांच्या मुलाने कुत्रा पाळला होता. त्यांच्या शेजारच्यांनी कुत्राच्या विष्ठेवरून वाद घालण्यास सुरूवात केली. दररोज होणाऱ्या बाचाबाचीचं रुपांतर वादामध्ये झालं. शेजारी राहणाऱ्या शुभम नावाच्या तरुणाने आपल्या साथीदारांच्या मदतीनं पासवान यांच्या मुलाला बेदम मारहाण करून हत्या केली. या प्रकरणात पासवान आणि त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या आहेत. शुभम आणि त्यांच्या साथीदारांनी लाठ्या, रॉडने बेदम मारहाण केली. जखमी पासवान दाम्पत्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या घटनेनंतर शुभम त्याच्या कुटुंबासह फरार झाला असून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुन्हा दाखल केला असून शुभम आणि साथीदारांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांची अधिक कुमक तैनात केली असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.