ताजी बातमी

ठाणे : विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरू केला असून शहरातील दोन कुख्यात गुंडांपैकी एकाला स्थानबद्ध, तर दुसऱ्याला तडीपार करण्यात आले आहे. सिद्धेश बाळा म्हस्कर उर्फ सिद्धेश उर्फ सिद्धु अभंगे (२७) आणि सौरभ वर्तक (३२) अशी या गुंडांची नावे आहेत.

अभंगे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगल घडवणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याच्या प्रस्तावाला पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंजुरी दिली. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत पोलिसांनी सुरुवात केली होती. त्याआधीच अभंगे गायब झाला. अंबरनाथ, बदलापूर, कळवा, कल्याण, पुणे, सोलापूर, हैदराबाद आदी वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करत होता. वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने त्याला पकडणे अवघड झाले होते, परंतु कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. . आगरकर, पोलिस निरीक्षक डी. गावडे यांच्या पथकाने गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सिद्धूला चिपळूण रेल्वे स्थानकात पकडले. अभंगे याला स्थानबद्ध करण्यात आले असून नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले. सौरभ वर्तक याच्याविरुद्धही खंडणी, दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याचीही मोठी दहशत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगडमधून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात