ताजी बातमी

नवमतदारांची ऑनलाइन नोंदणीत सुरू असलेली विसंगती अखेरीस मंगळवारी संपुष्टात आली. नवमतदारांसाठी ऑफलाइनचा पर्याय बंद झाला तरीही ऑनलाइन नोंदणी सोमवारपर्यंत सुरू असल्याचे आढळले होते. एकीकडे नवमतदारांसाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया २७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक असताना ऑनलाइनचा पर्याय कसा खुला राहिला, याचा उलगडा होत नव्हता. मंगळवारी मात्र सकाळनंतर नोंदणी बंद झाल्याचा अनुभव नोंदणीस उत्सुक नवमतदारांना येत गेला. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सने 'मतदारनोंदणीचा गोंधळ सुरूच' हे वृत्त ३० सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

मुंबईत काही दिवसांपासून नोंदणीतील परस्परविरोधी भूमिकांमुळे नवमतदारांमध्ये बराच गोंधळ उडत होता. वेगवेगळ्या केंद्रावर ऑफलाइन नोंदणीसाठी गेलेल्यांना तिथली प्रक्रिया बंद असल्याचे सांगून परत पाठविले जात होते. निवडणूक आयोगाच्या नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल (NVSP) वर जाउन ऑनलाइन नोंदणी सुरू असल्याने नेमका नियम कोणता याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. ऑनलाइनच्या मदतीने नोंदणीचे काम काही प्रमाणात सुरू असल्याने नोंदणीसाठी इच्छुक मतदारांमधील संभ्रम कायम होता. पण, मंगळवारी ऑनलाइन नोंदणी होते का, याचा पडताळा केला असता ही प्रक्रिया बंद झाल्याचे आढळले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात