ताजी बातमी

करीरोड येथील रामदूत इमारतीतील पाचव्या मजल्यावरील घरात शनिवारी पंखा कोसळून मुलीचा मृत्यू ओढवल्याच्या दुर्घटनेची म्हाडाने गंभीर दखल घेतली आहे. या पुनर्रचित पाच मजली इमारतीसह अन्य सर्वच पुनर्रचित इमारतींची धोकादायक स्थिती लक्षात घेत, तातडीने दुरुस्ती कामे हाती घेतली जाणार आहेत. तसेच, राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या गृहनिर्माण धोरणानुसार पुनर्विकासाच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जाणार आहेत.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाने १९७७ मध्ये बांधलेली रामदूत इमारत ही पुनर्रचित घटकातील आहे. सुमारे ४० वर्षांच्या कालावधीत या इमारतीमध्ये गळतीसारख्या समस्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. त्यावर वारंवार उपाय करूनही मूळ समस्या सुटलेली नसल्याने पुनर्वसन हा कळीचा मुद्दा आहे. एकूणच या इमारतींची अवस्था लक्षात घेता पुनर्विकासाच्या दृष्टीने योजना राबविण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. नुकतेच राज्य सरकारने जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने धोरणात नवीन गोष्टींचा समावेश केला आहे. त्याआधारे जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासावर भर दिला जाणार असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात