ताजी बातमी

नाशिक: पालकांच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडून चिमुकल्यांनी प्राण गमावल्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. एका 3 वर्षाच्या मुलाचा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 3 वर्षाचा मुलगा खेळत असताना पालकांनी लक्ष दिलं नाही आणि त्याचवेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

अवधूत सचिन वाघ असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे. रविवारी अवधूतचा तिसरा वाढदिवस होता. नेमक्या त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी नाशिकच्या विहितगाव परिसरात ही घटना घडली आहे. एकीकडे वाढदिवसाची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजुला ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना अवधूत हा घराबाहेर खेळत होता. त्यावेळी तो उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. या दुर्घटनेत अवधूतचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर अवधूतला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात