ताजी बातमी

उल्हासनगर : उल्हासनगर येथील कॅम्प नंबर दोन भागाच्या उच्चभ्रू वस्तीतील साई कुटीर नावाच्या पाच मजली इमारतीचा काही भाग शुक्रवारी दुपारी कोसळला. या इमारतीत शहरातील नामांकित आणि उच्चभ्रू नागरिकांचे वास्तव्य होते. स्लॅब कोसळल्यानंतर काही वेळातच महापालिकेने ही इमारत खाली करत सील केली.

पाच मजली साई कुटीर या इमारतीतील प्रत्येक मजल्यावर एकच फ्लॅट होता. त्यात तीन मजल्यावरील घरांमध्ये कुटुंबे वास्तव्य करत होती. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ही इमारत रिकामी करत कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अपघातानंतर इमारत एका बाजूला झुकल्याने ती तत्काळ सील करण्यात आली आहे. तसेच इमारत कोसळून जिवितहानी होण्याच्या भीतीने महापालिकेने या इमारतीतल रहिवाशांना इमारत स्वखर्चाने पाडण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा महापालिकेला इमारतीच्या पाडकामाचा खर्च द्यावा लागेल, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी करत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात