ताजी बातमी

पालिकेच्या दादर येथील कार्यालयातील शिपाई सुमित कुरळे (२३) याने कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली. याप्रकरणी दादर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दादरच्या सेनापती बापट मार्गावर पालिकेचे मल:निसरण प्रचलन आणि उदंचन कार्यालय आहे. डोंबिवली मानपाडा येथे राहणारा सुमित नेहमीप्रमाणे गुरुवारी कामावर आला. दहा वाजता कार्यालयातील इतर कर्मचारी चहा पिण्यासाठी तळमजल्यावर गेले. दोन महिला कर्मचारी आणि सुमित सहाव्या मजल्यावरील कार्यालयात होते. दोन महिला नाश्ता करीत असताना सुमितने गॅलरीमध्ये जाऊन उडी मारली. जोरदार आवाज झाल्याचे ऐकून सर्व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली. उंचावरून पडल्याने सुमितचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी चिट्ठी अगर इतर काही लिखित स्वरूपात सापडले नसल्याने त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. सुमित याच्या आई वडिलांचे निधन झाले असून तो अनुकंपा तत्त्वावर भरती झाला होता. सुमित मामाकडे राहत होता, अशी माहिती दादर पोलिसांनी दिली.

 

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात