सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, फेसबुक पोस्ट झाली VIRAL
मुंबई: काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आधी जोधपूर पोलिसांच्या समोरच सलमान जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता सोशल मीडियाच्य माध्यमातून त्याला पुन्हा एका जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी, स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब यूनिव्हर्सिटीचा ग्रुप 'सोपू' कडून देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर 'सोपू'च्या धमकीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. काळवीट हरणाची शिकार केल्या प्रकरणी सलमान खानच्या अपीलवर येत्या 27 सप्टेंबरला जोधपूरमध्ये सुनावणी होणार आहे.
'सोपू'च्या फेसबुक पेजवर गॅरी शूटर नावाच्या एका तरुणानं सलमान खानच्या पोटोवर लाल क्रॉस मार्क करत लिहिलं, 'सलमान तू विचार कर, तू देशाच्या न्यायालयात वाचशील मात्र बिश्नोई समाजाच्या आणि सोपू पार्टीच्या कायद्यानं तुला मृत्यूदंडाची सजा सुनावली आहे. सोपूच्या न्यायालयात तू नेहमीच दोषी आहेस. सलाम शहीदा नूं' ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.