ताजी बातमी

बेस्ट कामगारांचा बोनस आचारसंहितेत अडकला असतानाच आता नव्याने वाद उद्भवला आहे. बेस्टने सादर केलेल्या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली तरच बोनस मिळेल, अशी प्रशासनाची अट असल्याचा गंभीर आक्षेप बेस्ट वर्कर्स युनियनने घेतला आहे. प्रशासनातर्फे त्या आशयाचा -मेल अधिकाऱ्यांना पाठवला गेल्याचेही युनियनने नमूद केले. यासंदर्भात प्रशासनाचा निषेध करतानाच, न्यायालयातही धाव घेणार असल्याचेही युनियनने स्पष्ट केले आहे.

बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या बोनससंदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यासोबत अधिकाऱ्यांना एक -मेलही पाठविण्यात आला आहे. बेस्ट कामगारांनी परिपत्रकात परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यास बोनस देण्यात येणार नाही, असे त्यात नमूद केल्याचा आक्षेप युनियनने घेतला आहे. मात्र, बेस्ट कामगारांना मिळणारा बोनस आणि कराराचा कोणताही संबंध नसल्याचा मुद्दा युनियनचे शशांक राव यांनी मांडला आहे. कामगारांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न चुकीचा असल्याचेही म्हटले आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही राव यांनी सांगितले.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात