ताजी बातमी

उरणउरणमधील करंजा परिसरात राहणाऱ्या खलाशी कुटुंबातील एका विवाहित महिलेवर तीन इसमांनी सलग तीन ते चार दिवस अत्याचार केला. तिचा पती मासेमारीसाठी बोटीवर गेले होते. या संदर्भात उरण पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरणही करण्यात आले होते. याचा उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत. अजिंक्य दाभोळकर, वैभव कोळी विश्वनाथ गायकवाड अशी आरोपींची नावे आहेतघरात महिला एकटीच असल्याचा फायदा घेत या तिघांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यावेळी त्यांनी चित्रीकरण करून ते पसरविण्याची धमकी या महिलेला देण्यात आलेली होतीअसे असतानाही आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात महिलेने उरण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर उरण पोलिसांनी तिघांनाही अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी तपास करीत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात