ताजी बातमी

मुंबई : मालाड परिसरात महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ने अटक केली आहे. मोहम्मद शकील अब्दुल कादर (३२) असे आरोपीचे नाव असून तो मालवणी मालाड येथील रहिवासी आहे.

पीडित तरुणी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत असताना सप्टेंबरला रात्री ११.३० च्या सुमारास मालाड येथील चिंचोली बंदर बस थांब्याजवळ बसची वाट पाहत उभी होती. या वेळी तेथून जाणारा रिक्षाचालक मोहम्मद तरुणीजवळ आला आणि रिक्षात बस तुला सोडतो असे तिला म्हणू लागला. त्या वेळी तिने रिक्षाचालकाकडे बघितले असता, त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केल्याचे तरुणीला दिसले. तसेच तो विकृत पद्धतीने हावभाव करून तिच्याकडे पाहायला लागला. या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने मोबाइल फोन काढून त्याच्या या कृत्याचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या मोहम्मदने तेथून पळ काढला. मात्र घडल्या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने फोन करून आईला हा प्रकार सांगितला आणि मदतीसाठी तिला बोलावून घेतले. पीडित तरुणीची आई घटनास्थळी येऊन तिने तरुणीसह बांगुरनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

सापळा रचून पोलिसांनी मोहम्मदला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली. मोहम्मदविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांत विनयभंग आणि हाणामारीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात