ताजी बातमी

कामोठे सेक्टर-३४मधील एकदंत सोसायटीत राहणाऱ्या विवाहितेची तिच्या दोन वर्षीय मुलाची मोठ्या दिरानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुरेश चव्हाण असे या दिराचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आरोपी सुरेश हा काहीच कामधंदा करत नसल्याने त्याला कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी घरातून बाहेर काढले होते. याच रागातुन त्याने हे दुहेरी हत्याकांड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या घटनेत हत्या करण्यात आलेल्या जयश्री चव्हाण (२२) त्यांचा मुलगा अविनाश चव्हाण ( वर्षे) या दोघांचा समावेश आहे. यातील मृत जयश्री ही मुलगा अविनाश, पती योगेश चव्हाण आणि सासू-सासऱ्यांसह कामोठे सेक्टर-३४मधील एकदंत सोसायटीत राहत होती. तर आरोपी सुरेश जयश्रीचा मोठा दीर असून तो पूर्वी त्यांच्यासोबतच रहात होता. लहान भावाची पत्नी जयश्री घरात आल्यानंतर तिच्या सांगण्यावरूनच आई-वडील भावाने घराबाहेर काढल्याचा सुरेशचा समज होता. गणपतीनिमित्त सुरेशचे आई-वडील गावी गेले होते. त्यामुळे कामोठे येथील घरात लहान भाऊ योगेश त्याची पत्नी जयश्री त्यांचा मुलगा अविनाश हे तिघेच होते. सोमवारी लहान भाऊ योगेश हा कामावर गेल्यानंतर सुरेश घरी गेला होता. यावेळी त्याने जयश्रीसोबत त्याला घराबाहेर काढल्याच्या रागातून वाद घालून रागाच्या भरात जयश्री पुतण्या अविनाश या दोघांचा गळा आवळून हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी सुरेश जयश्री अविनाश या दोघांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास योगेश कामावरून घरी आल्यानंतर घरात पत्नी जयश्री मुलगा अविनाश हे दोघे मृतावस्थेत पडल्याचे त्याच्या निदर्शस आले. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. यावेळी सुरेश चव्हाण यानेच जयश्री अविनाश या दोघांची हत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात