ताजी बातमी

बाजू दिली नाही म्हणूनएनएमएमटीच्या चालकाला गाडीतून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. शुक्रवारी कोपरखैराणे येथे ही घटना घडली असून पालिसांनी तिघांना अटक केली आहे. गेल्या २० दिवसांत एनएमएमटी चालकाला मारहाणीची ही तिसरी घटना आहे.

श्रीधर रेवडेकर, शुभम रेडेकर, रविकांत साकपाळ असे अटक करण्यात आलेल्याएनएमएमटीबस चालकाला मारहाण आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास मार्ग क्रमांक १२ चीएनएमएमटीबस कोपरखैरणे येथून वाशीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी आरोपी आपल्या गाडीवरून जात होते. बसने बाजू दिली नसल्याचा रागातून त्यांनी ब्ल्यू डायमंड चौकातएनएमएमटीच्या समोर स्वत:ची गाडी थांबवत बसचालक नानाजी बुवा याला शिवीगाळ केली. त्यांना गाडी बाहेर काढून बेदम मारहाण केली ते निघून गेली. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपींचा गाडी क्रमांक मिळवून त्याद्वारे आरोपींचा शोध घेत अवघ्या दोन तासांत पोलिसांनी त्यांना अटक केली. एनएमएमटीचा पाठलाग करताना त्यांनी एका रिक्षालाही धडक देत पुढे आल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात