ताजी बातमी

शनिवारपासून मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अस्मानी संकटामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यातच हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय हवामान खात्याने आज मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहेराज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, नवी मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं शेलार यांनी ट्विटवरून जाहीर केलं आहे. राज्यातील इतर भागांतील पावसाची परिस्थिती पाहून तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी द्यायचा निर्णय घ्यावा असेही शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात