जे.डे. हत्याकांड : सबळ पुराव्याअभावी जिग्ना व्होरा निर्दोष
मुंबई : जे.डे.
हत्याकांड प्रकरणी जिग्ना व्होराला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडले आहे.
जे डे हत्याप्रकरणात जिग्ना व्होरावर माहिती पुरवण्याचा आरोप सीबीआयने केला होता.
मात्र सबळ पुरावा सरकारी पक्ष सादर करू न शकल्याने विशेष सत्र न्यायालयाने जिग्नाची निर्दोष ठरवत मुक्तता केली होती.
या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.
त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयाने जिग्ना व्होरा हिला जेडे हत्याकांडातून निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवले आहे.
वरिष्ठ पत्रकार जे. डे. यांची ११ जून २०११ रोजी भरदिवसा पवई येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
क्राईम ब्रांचनं
14 दिवसांत प्रकरणाचा छडा लावत
7 आरोपींना अटक केली होती.
त्यानंतर
4 आरोपींना अटक करण्यात आली.
एका आरोपीला म्हणजेच छोटा राजनला सीबीआयनं अटक केली आहे.
क्राईम ब्रांचनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं.
सीबीआयने याप्रकरणी तपासाअंती ५ ऑगस्ट २०१६ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.
त्यानंतर न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपींवर आरोप निश्चित केले होते.
सरकारी आणि बचाव पक्षाकडून साक्षी पुरावे नोंदवण्यात आले होते.
प्रकरणातील आरोपी
1) सतीश थांगपन उर्फ सतीश काल्या
2 ) अनिल भानुदास वाघमोडे
3 ) अभिजित काशिनाथ शिंदे
4 ) निलेश शेडगे उर्फ बबलू
5 ) अरुण जनार्दन डाके
6 ) मंगेश आगवणे
7 ) सचिन सुरेश गायकवाड
8 ) दीपक दलवीरसिंग सिसोदिया
9 ) छोटा राजन